Sakshi Sunil Jadhav
WhatsApp युजर्सना आता ios चे खास फीचर वापरता येणार आहे.
तुम्ही यामध्ये लाईव्ह फोटोसारख्या Motion फोटोचा आनंद घेता येणार आहे.
मेटा कंपनीने तुम्हाला इन्स्टंट मेसेडजिंग प्लॅटफॉर्ममध्ये व्हॉट्सअॅप लवकरच मोशन फोटो शेअरिंग फीचर सुरु करणार आहे.
तुम्ही यामध्ये फोटो क्लिक करण्यापूर्वी आणि नंतर मूव्हमेंट पाहू शकता.
विशेष म्हणजे लाइव्ह फोटोमध्ये फक्त हालचाल टिपली जाते पण यामध्ये तुमची मूव्हमेंट आणि तुमचा ऑडीओ सुद्धा कॅप्चर होणार आहे.
WhatsApp लवकरच सिंगल चॅट, ग्रुप चॅट आणि चॅनल्ससाठी नवीन शेअर मोशन फोटो फीचर आणणार आहे.
WhatsAppचं हे नविन फीचर ios वरील लाइव्ह फोटोजप्रमाणेच काम करेल. काही WhatsApp युजर्सना हा अॅक्सेस मिळाला आहे.
WhatsAppचे हे फीचर सध्या मोजक्याच बीटा टेस्टर्सना मिळाले आहे. याचा फीडबॅक घेतल्यावर सर्व युजर्सना तो वापरता येणार आहे.