Sakshi Sunil Jadhav
पदवीधारकांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सरकारी नोकरीची नवीन संधी आली आहे.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
इच्छुक उमेदवारांना aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रकिया पूर्ण करु शकतात. एअरपोर्टची ही भरती ९७६ पदांसाठी केली जाणार आहे.
तुम्ही ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह ११ पदे, अभियांत्रिकी सिव्हिलसाठी १९९ पदे, अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल २०८ पदे, माहिती तंत्रज्ञान ३१ पदे, इवेक्ट्रॉनिक्स ५२७ पदे ही पदवी असणार आहेत.
उमेदवारांचे वय २७ वर्षे पुर्ण असले पाहिजे. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारांना वयोगटात सूट देण्यात येईल.
उमेदवारांकडे आर्किटेक्चर किंवा त्यासंबंधित विषयात पदवी असणे यात आवश्यक आहे.
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी महिन्याला ४०,००० रुपये असणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. तर याची शेवटी तारिख २७ सप्टेंबर असणार आहे.