Sakshi Sunil Jadhav
किशोर कदम ३० वर्षे त्यांच्या अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. पुढे आपण त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
अभिनेते किशोर कदम यांनी १९९१ मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित 'अंतरनाद' या हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणून पदार्पण केले.
ब्लॅक फ्रायडे, एक चालीस की लास्ट लोकल, स्पेशल २६, झुंड अशा हिंदी चित्रपटांतल्या भुमिका किशोर यांनी गाजवलेल्या होत्या.
यांनी नटरंग, जोगवा, फॅंड्री, दिठी यांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं.
पानी, Territory या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाने विशेष छाप सोडली आहे.
अंधार माया या मराठी हॉरर वेब सिरीजमध्ये एक अभूतपूर्व कार्य केले.
सौमित्र या नावाने कवी म्हणून अनेक कविता लिहील्याय त्यांच्या गारवा या कवितासंग्रहाला खास लोकप्रियता मिळाली.
नटरंग मध्ये सादर केलेल्या अभिनयासाठी झी गौरव पुरस्कार आणि निळू फूले सन्मान या पुरस्कारांनी त्यांनी गौरव मिळवला.