Sakshi Sunil Jadhav
मोबाईल हा दैनंदिन आयुष्यातला महत्वाचा भाग झाला आहे.
बरेच जण झोपेतून उठल्यावर ४ सेकंदाच्या आत मोबाईल तपासायला सुरुवात करतात.
बऱ्याच वेळेस स्मार्ट फोन कुठेही ठेवतात. झोपताना अगदी उशी खाली सुद्धा मोबाईल ठेवला जातो.
फोन असा कोणत्याही ठिकाणी ठेवल्याने गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे झोपताना मोबाईल २ ते ३ फुटावर ठेवला पाहिजे.
काही लोक बाथरुममध्ये सुद्धा मोबाईल वापरतात. त्यामुळे फोनवर बॅक्टेरिया आणि विषाणू जमा होऊ शकतात. तुम्ही पुन्हा त्याच फोनला हात लावता आणि त्याच हाताने खायला सुरुवात करता.
काही व्यक्तींना फोन त्यांच्या पॅन्टमध्ये ठेवलेला असतो. त्याने रेडिएशनच्या संपर्कात मोबाईल राहतो आणि ट्यूमरचा धोका वाढायला सुरुवात होते.
कारच्या डॅशबोर्डवर फोन ठेवल्याने कारण ऊन पडल्यावर मोबाईल तापतो आणि मोबाईलच्या बॅटरीचे नुकसान होते.
मोबाईल रात्री चार्जिंगला लावून झोपण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्यामुळे मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन सुरक्षित जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.