Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच महिलांना असे वाटते की, जास्त शॅम्पू लावल्याने टाळू कोरडे होते आणि कोंडा वाढतो. पण हे खरं आहे? याबद्दल जाणून घेऊ.
डोक्यात कोंडा वारंवार होतो तेव्हा केसात बुरशीजन्य संसर्ग, घाण किंवा तेल साचलेले असते.
जर आठवड्यातून किंवा दररोज ५ ते ६ वेळा शॅम्पू करत असाल तर तो अति मानला जातो. त्याने केसांचे नुकसान होते.
तज्ज्ञांच्या मते दररोज शॅम्पू केल्याने टाळू स्वच्छ राहते आणि कोंडा कमी होतो.
जर तुम्ही कमी शॅम्पू वापरत असाल तर केसात, डेड स्किन, तेल, घाम जमा होतो आणि कोंडा होतो.
जर तुम्ही सौम्य आणि टाळूला सुट होणारा शॅम्पू वापरला तर केसांना काहीच नुकसान होत नाही.
तुम्ही दररोज शॅम्पूने केस धुवू शकता. त्याने तुमटा कोंडा सुद्धा कमी होईल.
केटोकोनाझोल किंवा झिंक पायरिथिओनसारखे घटक असलेला शॅम्पू केसांच्या मुळापासून कोंडा काढतो.