Sakshi Sunil Jadhav
शांत वातावरण, सुंदर निसर्ग आणि कसलीच दगदग अनुभवायची नसेल तर वेळास या कासवांच्या गावी नक्की भ्रमंती करा.
तुम्ही पनवेलपासून ५.३०ला बाईकने निघून पेन- मानगांव-गोरेगाव-दापोली आणि वेळास हा मार्ग निवडा.
पुढे तुम्ही १० वाजेपर्यंत वेळास गाव गाठू शकता. तिथे तुम्ही Olive Ridley कासवांचे अंड्यातून बाहेर येणारे पिल्ले पाहून शांत समुद्र अनुभवा.
पुढे १२.३० पर्यंत मातीची गावातली घरे, कोकणी बागा आणि तिथल्या माणसांचे सोबत छान गप्पा मारु शकता.
दुपारी तुम्हाला गावातील होमस्टेमध्ये कोकणी पद्धतीचे जेवण मिळेल. पुढे तुम्ही अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य पाहू शकता.
संध्याकाळी तुम्ही पुन्हा वेळास समुद्रावर जाऊन कासव सोडण्याचा कार्यक्रम पाहू शकता.
तुम्ही ५ वाजता निघून पुन्हा परतीचा प्रवास करु शकता. हा प्रवास अंदाजे २३० किमीचा असेल.