Manasvi Choudhary
गादी धूळ किंवा खराब झाल्या की त्या स्वच्छ कश्या करायच्या? असा प्रश्न महिलांना असतो.
गादी वजनाला जड असते त्यामुळे गादी उन्हात ठेवणे किंवा वारंवार धुणे कठिण होते यामुळे वर्षानुवर्षे गाद्या स्वच्छ करत नाही यामुळे गादी हळूहळू त्या घाणेरड्या आणि खराब होतात आणि त्यातून हलका वासही येऊ लागतो.
गादीवरची डाग,धूळ आणि दुर्गंधी जमा होते अशावेळी तुम्ही काही घरगुती सोप्या उपायांनी गाद्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
गादी स्वच्छ राहण्यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाचे मॅट्रेस क्वहर वापरणे उत्तम राहील. गादी कव्हर वापरल्यामुळे धूळ, डाग आणि घाण होत नाही. याशिवाय कव्हर सहजपणे धुता येतो.
गादी स्वच्छ करण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा लावून ठेवा. साधारण ३० मिनिटे किंवा १ तास तसेच ठेवा. बेकिंग सोड्यामळे ओलावा आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. गादीवर बेकिंग सोडा टाकल्यानंतर स्वच्छ झाडूने किंवा ब्रशने काढून टाका यामुळे गादीवरील धूळ आणि अन्नाचे कण निघून जातील.
एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यात बेकिंग सोडा मिक्स करा नंतर मीठ आणि टाका. या द्रावणात सुती कापड भिजवून घट्ट पिळून घ्या. त्यात गादी पुसून घ्या. गादीवर साचलेली धूळ आणि घाण काढून टाकण्यास मदत होते.
गादी स्वच्छ केल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात ठेवण्याची गरज नाही. रूमध्ये पंख्याखाली तुम्ही गादी सुकवा.