Anganwadi Sevika Salary: अंगणवाडी सेविकांच्या खात्यात येणार २ हजार रुपये? सरकारचा नवा निर्णय

Anganwadi New GR 2026 : अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी सरकारने प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलले आहेत.
Anganwadi Sevika Salary
Anganwadi Sevika Salarymeta ai
Published On: 

Anganwadi New GR 2026: राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे दर महिन्याला १० निकषांवर मूल्यांकन होईल. त्यानुसार सेविका आणि मदतनीसांनी ७०० ते २००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो. हे नवे निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलं.

किती मिळणार प्रोत्साहन भत्ता?

नव्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी केंद्राने १० पैकी किमान ७ निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. किती निकष पूर्ण झाले, त्यानुसार सेविका आणि मदतनीसांच्या भत्त्याची रक्कम ठरवण्यात आली.

७ निकष पूर्ण - सेविका १,४०० रुपये, मदतनीस ७०० रुपये.

८ निकष पूर्ण - सेविका १,६०० रुपये, मदतनीस ८०० रुपये.

९ निकष पूर्ण - सेविका १,८०० रुपये, मदतनीस ९०० रुपये.

१० निकष पूर्ण - सेविका २,००० रुपये, मदतनीस १,००० रुपये.

Anganwadi Sevika Salary
Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोनं तब्बल ३८०० रुपयांनी स्वस्त! चांदीही ९ हजारांनी घसरली

कोणते आहेत नवीन १० निकष?

अंगणवाडीमध्ये चालणारे कामकाज तपासण्यासाठी विभागाने १० निकष ठरवले आहेत. यामध्ये दर महिन्याला दोन समुदाय आधारित कार्यक्रम घेणं, पात्र लाभार्थ्यांना २५ दिवस घरपोच आहार देणं आणि तीन ते सहा वर्षांच्या ८० टक्के बालकांची उपस्थिती राखणं याचा समावेश आहे. तसेच ९५ टक्के बालकांना महिन्यातल्या किमान २५ दिवस गरम ताजं जेवण आणि नाश्ता देणं गरजेचं आहे. दर महिन्याला आहार आरोग्य दिन आयोजित करून त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करावी लागेल.

Anganwadi Sevika Salary
Maharashtra Exam Fee Refund : दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्काचे ५० टक्के पैसे थेट खात्यात जमा होणार

अंगणवाडी केंद्र महिन्यात २५ दिवस सुरू ठेवावी लागेल. फेब्रुवारी महिन्यासाठी ही अट २४ दिवसांची असेल. तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी किमान दोन पूर्वशालेय शिक्षण उपक्रम राबवणं, बालकांची उंची आणि वजनाची अचूक नोंद ठेवणं आणि सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पूर्ण करणंही बंधनकारक असेल.

नोव्हेंबर २०२६ पासून नवीन नियम लागू

तर या निर्णयानुसार अंगणवाडी केंद्रांचं मूल्यांकन दर महिन्याला पोषण ट्रॅकर अॅमधल्या माहितीच्या आधारे केलं जाईल. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी नवीन निकष पूर्ण करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.