Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोनं तब्बल ३८०० रुपयांनी स्वस्त! चांदीही ९ हजारांनी घसरली

Jalgaon Gold Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On: 

साम प्रतिनिधी,

संजय महाजन जळगाव

जळगावमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण सुरू आहे. मध्येच दोन दिवस दर वाढल्याने पुन्हा तेजी येण्याची शक्यता होती. मात्र आज तिसऱ्या दिवशी पुन्हा सोन्या-चांदीचा भाव घसरले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आठवड्याच्‍या सुरवातीचे दोन दिवस सोने– चांदीच्‍या भावात वाढ झाली होती. मागील दोन दिवसात सोने व चांदीत सरासरी चार हजार रूपयांची वाढ झाली होती. परंतु, आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्‍या चढउताराचा परिणाम सराफ बाजारात झाल्‍याचे दिसून आले. यामुळे दोन दिवस भाव वाढ झाल्‍यानंतर आज सुवर्ण बाजारात भाव खाली आले आहेत. आज मोठ्या फरकाने भाव कमी झाल्‍याने खरेदीदारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today
Maharashtra Exam Fee Refund : दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्काचे ५० टक्के पैसे थेट खात्यात जमा होणार

सोने ३८००, चांदी ९ हजाराने घसरली

दोन दिवसांपासून सोने– चांदीच्‍या भावात वाढ होत असल्‍याचे चित्र आहे. मात्र बुधवारी (ता.२५) भाव मोठ्या फरकाने खाली आले आहेत. दरम्‍यान मंगळवारी (ता. २४) सोन्याचा भाव एक लाख २६ हजार ८०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. आज तब्‍बल ३ हजार ८०० रूपयांनी भाव कमी होवून सोने एक लाख २३ हजार रुपयांवर आले आहे. तर चांदीच्‍या भावात देखील ९ हजार रूपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदी एक लाख ५८ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवरून एक लाख ४९ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Gold Price Today
Car & Bike Insurance Rules : सिग्नल तोडणाऱ्यांनो सावधान! आता इन्शुरन्ससाठी मोजावे लागतील जास्त पैसे?

काही दिवसांतील सोने-चांदीचे भाव

२१ नोव्‍हेंबर - १ लाख २३ हजार ५०० - १ लाख ५४ हजार

२२ नोव्‍हेंबर - १ लाख २३ हजार ५०० - १ लाख ५४ हजार

२३ नोव्‍हेंबर - १ लाख २६ हजार २०० - १ लाख ५७ हजार

२४ नोव्‍हेंबर - १ लाख २६ हजार ८०० - १ लाख ५८ हजार

२५ नोव्‍हेंबर - १ लाख २३ हजार - १ लाख ४९ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.