Home Rent Rules Saam Tv
बिझनेस

Home Rent Rules: केंद्राचा मोठा निर्णय! घरभाडे कराराच्या नियमांत केला मोठा बदल; मालक आणि भाडेकरुंना होणार फायदा

Home Rent Rules 2025: घरभाडे कराराच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. आता घरमालक आणि भाडेकरुंना ऑनलाइन पद्धतीने घरभाडे करार रजिस्टर करावा लागणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारचा घरभाड्याबाबत महत्त्वाचा निर्णय

घरभाडे कराराचे नियम बदलले

वर्षातून एकदाच बदलता येणार भाडे

केंद्र सरकारने या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात घरभाड्याबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने Home Rent Rules 2025 लागू केले आहेत. यामागचे उद्दिष्ट म्हणजे भाड्याने घर देणे अधिक पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने व्हावे. यामुळे घर घेणे अधिक सोपे होणार आहे. याचसोबत मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. घरमालक अनेकदा जास्त डिपॉझिट घेतात त्याला आळा बसणार आहे.

आता या नवीन नियमांनुसार, घरमालक आणि भाडेकरुंना आपला भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावा लागेल. या नियमात सिक्युरिटी डिपॉझिटची लिमिटदेखील निश्चित केली आहे. तसेच कधी किती भाडे वाढणार, याबाबत सर्व माहिती असणार आहे. याचसोबत घर सोडताना रिपेअर, इन्स्पेक्शन याबाबत सर्व माहिती असेल. यामुळे घरमालक आणि भाडेकरुंमधील वादविवाद होणार नाही. यामुळे मुंबई, पुणे, बंगळुरु येथील भाडेकरुंना दिलासा मिळणार आहे.

घरमालकांना दिलासा

या नवीन नियमांमुळे घरमालकांनाही दिलासा मिळणार आहे. घर भाड्याने देण्याची प्रोसेस सर्वकाही डिजिटल होणार आहे. यावर डिजिटल स्टॅम्प लागणे खूप गरजेचे आहे. ६० दिवसांच्या आत हे रेंट अॅग्रीमेंट ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

नियम (Home Rent 2025 Rules)

मेट्रो सिटीमध्ये १० महिन्यांसाठी डिपॉझिट घेतले जाते. नवीन सिस्टीमअंतर्गत रेजिडेंशियल सिक्युरिटी डिपॉझिट दोन महिन्यांसाठी मर्यादित असणार आहे. नवीन नियमांनुसार, घरभाडे वर्षातून एकदा बदलता येणार आहे. यासाठी घरमालकाला ९० दिवस म्हणजे ३ महिने आधी नोटिस द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: रायपूरमध्ये टीम इंडियाची नवी रणनीती? प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा

SBI Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी अन् ४४ लाखांचं पॅकेज, ९९६ पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

Koregaon Bhima : उद्धव ठाकरेंच्या नावे अटक वॉरंट काढा, प्रकाश आंबेडकरांचा आयोगाकडे अर्ज, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT