SIM Card Rules: हे काम आताच करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, स्नॅपचॅट कायमचे होणार बंद

WhatsApp Telegram Messaging App Doesn't Work Without SIM: मेसेंजिग अॅपसाठी एक नवीन नियम जारी केले आहेत. आता मेसेंजिग अॅपसाठी सिम कार्ड असणे अनिवार्य आहे.
SIM Card Rules
SIM Card RulesSaam Tv
Published On
Summary

मेसेंजिग अॅपच्या नियमांत बदल

आता मेसेंजिग अॅपसाठी सिम कार्ड असणे अनिवार्य

सिम कार्डशिवाय चालणार नाही व्हॉट्सअॅप, टेलिग्राम

भारत सरकारने मेसेंजिंग अॅप्ससाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहे. देशातील कोट्यवधी युजर्स रोज व्हॉट्सअॅप,

टेलिग्राम, स्नॅपचॅटचा वापर करतात. आता या अॅप वपरणाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम आहेत. WhatsApp, Telegram, Snapchat, ShareChat,Jio Chat, Josh अशा अॅपसाठी नियम लागू केले जाणार आहे.

SIM Card Rules
UPI Rule: सरकारचा मोठा निर्णय! UPI च्या नियमांत मोठा बदल, उद्यापासून होणार लागू

आता मेसेजिंग अॅप वापरण्यासाठी तुमच्याकडे सिम कार्ड असणे अनिवार्य आहे. जर सिम कार्ड नसेल तर हे अॅप काम करणार आहे. दूससंचार विभागाने TeleCommunication Cybersecurity Amendment Rules 2025 अंतर्गत हे नियम लागू करण्यात आले आहेत.

देशात पहिल्यांदा मेसेंजिग आधारित अॅपसाठी अशी नियमावली जाहीर केली आहे. नवीन सिम बाइंडिंग नियम या अॅपवर लागू होणार आहेत. याआधी बँकिंग, यूपीआयसाठी सिम कार्ड बाइंडिंग नियम गरजेचे होते.या अॅपसाठी सिम कार्ड गरजेचे आहे. असेच नियम आता व्हॉट्सअॅप, टेलिग्रासाठी लागू होणार आहे.

SIM Card Rules
आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

नवीन नियम काय आहेत? (SIM Card New Rules)

सरकारने या नवीन अॅपला Telecommunication Indentifier User Entities (TIUEs)श्रेणीअंतर्गत येतात. आता या अॅपसाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे गरजेचे आहे. अॅप्सना ९० दिवसांच्या आत ही सेवा लागू करायची आहे.

याचसोबत वेब ब्राउजरवरुन अॅप वापरणाऱ्यांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता ६ तासांच्या आता अॅप लॉग आउट होणार आहे. लॉग आउट झाल्यानंतर तुम्हाला परत क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यांनुसार, या नवीन नियमांमुळे खोटे अकाउंट तयार करणे मुश्कील होणार आहे. तुम्हाला दरवेळी सिम कार्ड अॅक्टिव्ह आणि व्हेरिफाय करणे गरजेचे आहे.

SIM Card Rules
Corn Appe: संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा मक्याचे अप्पे; १० मिनिटांत होतील तयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com