Dhanshri Shintre
२०२५ मध्ये TRAI ने Airtel, Jio, BSNL आणि Vi यांना डेटा नसलेले स्वस्त प्लॅन लाँच करण्याचे आदेश दिले होते.
ट्रायच्या आदेशानंतर खाजगी कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लॅन सुरू केले, ज्यामुळे ग्राहकांना सिम कार्ड सुरू ठेवता येते.
खाजगी कंपन्यांचे नवीन प्रीपेड प्लॅन फक्त व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी उपलब्ध आहेत, डेटा वापरासाठी नाहीत.
या प्लॅनमध्ये ८४ ते ३६५ दिवसांची वैधता आहे, हे फीचर फोन यूजर्ससाठी हे प्लॅन उपयुक्त आहेत.
एअरटेलचे डेटा नसलेले २ रिचार्ज प्लॅन्स आहेत, ८४ दिवसांसाठी ४६९ रुपये, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगसह. ३६५ दिवसांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे.
एअरटेलच्या ३६५ दिवसांच्या प्लॅनमध्ये १८४९ रुपये खर्च, अमर्यादित कॉलिंग, मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि सुमारे ३६०० मोफत एसएमएस मिळतात.
Jio कडे ८४ आणि ३३६ दिवसांच्या वैधतेसह दोन प्लॅन्स आहेत, ज्यात ८४ दिवसांमध्ये अमर्यादित कॉलिंग मिळते.
८४ दिवसांच्या Jio प्लॅनची किंमत ४४८ रुपये असून १,००० मोफत एसएमएस मिळतात; ३३६ दिवसांच्या प्लॅनसाठी १७४८ रुपये आणि ३६०० एसएमएस उपलब्ध आहेत.
Vi-व्होडाफोन आयडियाकडे डेटा नसलेले दोन प्लॅन्स असून, ८४ दिवसांसाठी ४७० रुपये देणे आवश्यक आहे.
Vi चा ३६५ दिवसांचा प्लॅन १८४९ रुपये असून, फायदे एअरटेलच्या प्लॅन्ससारखेच उपलब्ध आहेत.