Siddhi Hande
अप्पे तर सर्वांनाच आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण साउथ इंडियन पदार्थ आवडीने खातात.
तुम्ही कधी मक्याचे आप्पे खाल्लेत का? काही मिनिटांत तुम्ही हे अप्पे बनवू शकतात.
मका,पोहे, रवा, तांदळाचे पीठ, बेसन, कांदा, टॉमेटो, हिरवी मिरची, लसूण आणि आलं पेस्ट, तेल, मीठ
सर्वात आधी पोहे धुवून घ्या. ते भिजत ठेवा.
यानंतर मिक्सरमध्ये मक्याचे दाणे, हिरवी मिरची, आलं-लसूण याची जाड पेस्ट तयार करुन घ्या.
एका मोठ्या भांड्यात रवा, भिजवलेले पोहे, मक्याची पेस्ट, कांदा, टॉमेटो टाकून मिक्स करा. त्यात थोडं दही टाका.
यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करा.
हे मिश्रण जास्त घट्ट नसावे. त्यात थोडं पाणी टाकून छान मिक्स करुन घ्या.
यानंतर अप्पे पात्र गरम करा. त्यात तेल टाका. यानंतर पीठ चमच्याने साच्यांमध्ये टाका.
यानंतर अप्पे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या. हे अप्पे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात.
Next: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रवा खीर, वाचा सोपी रेसिपी