GST  Saam Tv
बिझनेस

Good News: कर्ज स्वस्त झालं, सरकार आणखी एक खुशखबर देणार, थेट तुमच्यावर परिणाम होणार

GST Council Of India: केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२ टक्के टॅक्स स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आज रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटनंतर आता मोदी सरकार सर्वसामान्यांना अजून एकद दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सरकारी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, १२ टक्के जीएसटी कर रद्द करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत काउन्सिल निर्णय घेऊ शकते. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२ टक्के टॅक्ससंदर्भात चर्चा होऊ शकते, असं सांगितलं आहे.

१२ टक्के जीएसटी टॅक्स स्लॅब रद्द होणार?

जीएसटी दरात बदल करण्याबाबत सरकारकडून पाऊल उचलले जाऊ शकते. सध्या चार टॅक्स स्लॅब आहेत. ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के. यातील एक टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ टक्के GST टॅक्स स्लॅब काढून टाकण्याच्या प्रस्तावाला केंद्रिय, राज्य अधिकाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. आता यासंदर्भात कौन्सिलला निर्णय घ्यायचा आहे.

१२ टक्के स्लॅबमध्ये कोणत्या गोष्टी येतात?

कंडेन्स्ड मिल्क, २० लिटर बाटल्यांमधील पिण्याचे पाणी, कॉन्टॅक्ट लेन्स, चीज, खजूर, सुकामेवा, फ्रोजन भाज्या, सॉस,मांस उत्पादने, मेयोनेझ, जॅम, जेली, करी पेस्ट, टूथ पावडर, कार्पेट, छत्री, टोप्या, फर्निचर,पेन्सिल, हँडबॅग आणि शॉपिंग बॅग, पादत्राणे,हॉटेल निवास, नॉन- इकोनॉमी क्लासेसमध्ये विमानाने प्रवास करणे, या गोष्टी जीएसटीच्या १२ टक्के स्लॅब येतात.

जीएसटी कौन्सिलची बैठक जून किंवा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पुढच्या बैठकीत १२ टक्के जीएसटी स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत वस्तू ५ टक्के आणि १८ टक्के स्लॅबमध्ये सामील होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT