
तुम्ही युपीआय पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुर्दंड बसणार आहे...कारण, आता तुम्हाला पेमेंटसोबत जीएसटीही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? खरंच केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, देशभरात कोट्यवधी युजर्स यूपीआयचा वापर करत असतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर जीएसटी लावली जाणार.त्यामुळे आता 2 हजारांवरील व्यवहार करणं महागणार आहे'.
हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे...कारण, यूपीआयद्वारे अनेकजण 2 हजार पेक्षा जास्त व्यवहार करतात...आधीच महागाई वाढत चाललीय. त्यात आता यूपीआयवरही जीएसटी लागत असल्याने नक्कीच भुर्दंड बसणार आहे.
त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत माहिती केंद्र सरकारकडून मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने याबद्दल माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
UPI व्यवहारांवर जीएसटी आकारणीसंदर्भात प्रस्ताव नाही
2 हजारांवरील व्यवहारावर जीएसटी लावलेली नाही
दावे तथ्यहीन असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण
असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत 2 हजारवरील यूपीआय व्यवहारावर जीएसटी लावणार असल्याचा दावा असत्य ठरला..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.