ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकजण टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात.
तुम्ही सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ किंवा विमा योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्सपासून सवलत मिळते.
तुमची पत्नीदेखील तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकते.
ं
तुमची पत्नीदेखील तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकतात.
आयकर कलम ६० ते ६४ अंतर्गत जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे जमा करतात. ज्यातून पत्नीला उत्पन्न मिळते. हे पैसेदेखील तुमच्या उत्पन्नात जोडले जाते. त्यावर कर लागतो. याला क्लबिंग नियम म्हणतात.
परंतु हा नियम फक्त काही ठिकाणी लागी होतो. जर तुम्ही पत्नीला खर्चासाठी पैसे देतात आणि तुमची पत्नी ते पैसे वाचवते.त्यावर टॅक्स लागत नाही.
तुम्ही आरोग्य विमा घेऊन टॅक्स वाचवू शकतात. आयकर कलम 80D अंतर्गत कुटुंबाच्या नावावर विमा घेऊन वीमा प्रिमियमवर २५००० रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकतात.
तुम्ही जर पत्नीला काही रक्कमेचे कर्ज दिले तर त्यातही तुम्ही कर वाचवू शकतात. कमी व्याजदराने हे कर्ज द्यायचे आहे.
हे कर्ज देण्यासाठीची सर्व प्रोसेस कागदोपत्री व्हायला हवी.
तुम्ही गुंतवणूकीसाठी जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या खात्यात प्रायमरी होल्डरला बायकोला ठेवा. ज्याची टॅक्स लायबलिटी कमी आहे त्यांना प्राथमिक होल्डर ठेवा.