RBI कडून खुशखबर! होम लोन स्वस्त होणार, रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा ही कपात करण्यात आली आहे. ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

RBI
RBI Repo Rate: सलग तिसऱ्यांदा कर्जाचा EMI कमी होण्याची शक्यता; शुक्रवारी RBI मोठा निर्णय घेणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली आहे. पतधोरण बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही दोनदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

रेपो रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. याआधी रेपो रेट ६ टक्के होता. आता ५० बेसिस पॉइंट्सने कपात केल्यानंतर रेपो रेट ५.५ टक्के झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करत आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI
HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल! ग्राहकांच्या खिशावर परिणाम

रेपो रेट म्हणजे नक्की काय? (What Is Repo Rate)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट निश्चित करते. या रेपो रेटवरच आधारित प्रत्येक बँक आपल्या कर्जाचे व्याजदर ठरवते. सर्व बँकांना या रेपो रेटचं पालन करावे लागते. त्यानुसारच त्यांना कर्जावरील व्याजदर ठरवता येतो. जर रेपो रेट कमी झाला तर कर्जावरील व्याजदरदेखील कमी होणार आहे. जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर कर्जावरील हप्ता वाढतो. म्हणजेच व्याजदर वाढते.

कर्जाचा हप्ता कमी होणार (Loan EMI Will Decrease)

रिझर्व्ह बँकेने याआधी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे.जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.

RBI
SBI SIP Scheme: महिन्याला २५० रुपये गुंतवा अन् ७८ लाख रुपये मिळवा; स्टेट बँकेच्या SIP मुळे व्हाल मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com