Jobs  Saam tv
बिझनेस

Abroad Job: परदेशात तरुणांना नोकरीची मोठी संधी; भारत सरकार करतंय मदत; कसं? सविस्तर जाणून घ्या

Government Help People To Improve Skill: भारतात सर्वाधित तरुण वर्ग आहे. त्यामुळे सर्वाधिक काम करणारे लोक भारतात राहतात. यापैकी अनेकांना परदेशात काम करण्याची इच्छा असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत देशात सर्वाधिक तरुण आहेत. म्हणजेच भारतात सर्वात जास्त काम करणारा गट आहे. भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात कामासाठी जायचे असते. परदेशात कामाच्या जास्त संधी उपलब्ध असतात. त्यामुळेच अनेक भारतीय परदेशात नोकरी करतात. जर तुम्हीही परदेशात नोकरी करण्याच्या विचार करत असाल तर सरकार तुम्हाला मदत करणार आहे. सरकार तुमचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सरकार भारतातील लोकांचे कौशल्य वाढवणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था अजूनच बळकट करण्यासाठी सरकार तरुणाईचे कौशल्य वाढवणार आहेत. त्यांना शिकण्यासाठी मदत करणार आहेत.

एका सर्व्हेनुसार जगभरात जवळपास ३.५८ दशलक्ष जॉब आहेत. देशातील १६ देशांमध्ये सर्वाधिक जॉब आहेत. यूएस, सौद अरेबिया, यूएई, कॅनडा, कतार, कुवेत, ओमन, ऑस्ट्रेलिया, जपान, यूके या देशांमध्ये सर्वाधित जॉबसाठी जागा आहेत.

भारतातील ६८ टक्के लोक १५ ते ६४ वययोगटातील आहेत. हे संपूर्ण वय काम करण्याचे वय आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक काम करणारे लोक भारतात आहे. त्यामुळे भारताला जगासाठी उच्च दर्जाचे कामगार निर्माण करण्याची ही उत्तम संधी आहे.

यासाठी भारतातील तरुणाईला MSDE या पोर्टलवर रजिस्टर करावे लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराची संपूर्ण माहिती चेक केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला आवश्यक कौशल्य अपग्रेडेशन प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर सरकार वेगवेगळ्या देशांशी समन्वय साधून उमेदवारांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले जातील.

देशातील अनेक उमेदवारांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी मदत होईल. जगभरात अनेक देशांमध्ये कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, सायन्स, टेक्नोलॉजी, टॅव्हल या इंडस्ट्रीत काम आहेत. यूएस आणि कॅनडामध्ये सर्वाधित जॉब उपलब्ध आहेत. त्यात सायन्स, टेक्नोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर या पदांसाठी जॉब उपलब्ध आहे. भारतातील अनेक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळे सरकार तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT