महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नवीन बदल झालेले दिसून येतात. त्यानुसार येत्या जून महिन्याच्या पहिल्या तारखेला काही बदल होणार आहेत. जे बदल तुमच्या वाहन चालवण्यापासून ते घरातील स्वयंपाक घरातील गोष्टींवर परिणाम करणार आहेत.
मे महिना संपण्यासाठी काही दिवस राहिले असून जून (June)महिन्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी फक्त आता अवघे ४ दिवस राहिले आहेत. मात्र त्यानंतर जूनच्या पहिल्या तारखेपासून देशात काही मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. या बदलामुळे आपले आर्थिक बजेट कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याबदलामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती ते क्रेडिट कार्डचे नियम समाविष्ट आहेत. जाणून घेऊयात अशाच ५ मोठ्या बदलांबद्दल.
ऑईल मार्केटिंग कंपनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करत असल्याचे आपण पाहतो. सिलेंडरच्या किंमती १ जून २०२४ च्या सकाळी ठीक सहा वाजल्यापासून जाहीर केल्या जातात.गेल्या काही काळापासून तिथे १९ किलोग्राम कॉमर्शियल गॅल सिलेंडरची(cylinder) किंमतीत अनेक बदल पाहायला आपल्याला मिळाले परंतू १४ किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत काही बदल झालेले नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची सर्वसामान्य नागरिकांना आशा आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधनच्या किंमती सांगत असतात. याबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती देखील सांगत असतात. त्यातच जूनच्या पहिल्या तारखेला या सर्वांच्या नवीन किंमती जाहीर करण्यात येतील.
जून महिन्याच्या १ तारखेपासून एसबीआई क्रेडिड कार्डच्या नियमात काही बदल होणार आहे. एसबीआई कार्डच्या नियमानुसार, जून २०२४ पासून काही क्रेडिट कार्डसाठी सरकारशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत.
जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ड्राइव्हिंग लाइसेंसच्या नियमातही बदल होणार आहेत. त्यामध्ये १ जून २०२४ पासून प्राइव्हेट इंस्टीट्यूट मध्येही ड्राइव्हिंग टेस्ट होऊ शकणार आहे. याआधी तुम्हाला जर ड्राइव्हिंग लाइसेसं पाहिजे असल्यास तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागत होती मात्र आता त्याची आवश्यकता नसणार.
पाचवा बदल हा १ जूनपासून लागू न होता तो १४ जूनपासून लागू होऊ शकतो. यूआईडीएआईने आधार कार्डला फ्रीमध्ये अपडेट करणारी मर्यादाला वाढवून १४ जूनपर्यंत केले आहे. जर तुम्ही दिलेल्या तारखेच्या आत आधार कार्ड अपडेट न केल्यास तुम्हाला १४ जूननंतर त्यासाठी पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.