Business Idea: २० ते ३० किलो रुपयांच्या टोमॅटोमधून कमवा लाखो रुपये; घरी सुरू करा टोमॅटो केचपचा व्यवसाय

Tomato ketchup Business : प्रत्येक हंगामात चालेल असा व्यवसाय तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. वर्षभर त्या व्यवसायाची मागणीही हवी आणि त्यातून कमाईही दमदार झाली पाहिजे असं वाटत असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. यात तुम्हाला व्यवसायाची कल्पना आणि त्यातून किती रुपयांचा फायदा तुम्हाला मिळेल याची माहिती होईल.
Tomato ketchup Business
Tomato ketchup BusinessSocial Media
Published On

Tomato ketchup Business Idea :

जेव्हा कोणी नवीन व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचा व्यवसाय प्रत्येक हंगामात चालला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. तसेच त्यातून मोठी कमाई मिळेल अशी अपेक्षा असते. आज आपण अशा एका व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत, ज्यातून आपण लाखो रुपयांची कमाई करू शकतो आणि तुमच्याकडील उत्पादनाची मागणी वर्षभर असेल. टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचपचा हा व्यवसाय आहे. जो तुम्ही घरीच सुरू करू शकता.(Latest News)

टोमॅटोचा समावेश प्रत्येकाच्या आहारात असतो. आजकाल चटणी सुद्धा त्याशिवाय अपूर्ण समजली जाते. भाज्यांपासून ते सॉस, केचप किंवा पिझ्झा, बर्गर इत्यादी सर्व गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. वर्षातील 12 महिने बाजारात टोमॅटोला मागणी असते. टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचपला बहुतेक घरांमध्ये किंवा हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये. नेहमीच मागणी असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोमॅटो सॉस व्यवसायासाठी किती खर्च येईल?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करते. पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी तयार केलेल्या प्रकल्प प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो सॉस व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण ७.८२ लाख रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला स्वतःहून फक्त १.९५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज घेऊन उर्वरित पैशांची व्यवस्था केली जाईल. यामध्ये सर्व प्रकारची यंत्रसामग्री आणि उपकरणे यासाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात येत असतो. टोमॅटो, कच्चा माल, साहित्य, कामगारांचे पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडे आदींवर ५.८२ लाख रुपये खर्च लागेल. तर टर्म कर्ज १.५० लाख रूपये असेल. खेळते भांडवल कर्ज ४.३६ लाख रुपये असेल. मुद्रा योजनेंतर्गत हे कर्ज कोणत्याही बँकेतून सहज उपलब्ध होईल.

प्रत्येक वयोगटातील लोक त्यांच्या जेवणात टोमॅटोचा वापर करतात. अनेक प्रकारच्या फास्ट फूडमध्ये टोमॅटोचा वापर होत असल्याने त्याची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. टोमॅटोला ग्रामीण भागापासून शहरे, छोटी शहरे, मेट्रो शहरांपर्यंत मोठी मागणी आहे. यामुळे तुमच्या या व्यवसायाला प्रगती करण्याची चांगली संधी आहे.

टोमॅटो सॉसमधून किती कमाई होते?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अहवालानुसार ७.८२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह वार्षिक उलाढाल २८.८० लाख रुपये असू शकते. वार्षिक खर्च २४.२२ लाख रुपये असू शकतो. उलाढालीतून खर्च वजा केल्यावर तुमच्याकडे ४.५८ लाख रुपये शिल्लक राहतील. हा तुमचा वार्षिक निव्वळ नफा असेल. म्हणजेच तुम्हाला दरमहा सुमारे ४०,००० 00 रुपये मिळतील.

टोमॅटो सॉस बनवण्याचे युनिट स्थापित करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नाही. सॉस तयार करण्यासाठी, सर्व प्रथम कच्चे आणि पिकलेले टोमॅटोचे लहान तुकडे करून वाफेच्या केटलमध्ये उकळले जातात. यानंतर उकडलेल्या टोमॅटोचा लगदा तयार केला जातो आणि बिया आणि फायबर वेगळे केले जातात. त्यानंतर या केचपमध्ये आले, लसूण, लवंगा, काळी मिरी, मीठ, साखर, व्हिनेगर इ. पल्पमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह देखील टाकले जातात

Tomato ketchup Business
Bamboo Planting: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या पिकासाठी मिळणार ७ लाखाचं अनुदान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com