ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानने जावं लागतं.
जगातील सर्वात मोठं विमानतळ किंग फहाद अंतराष्ट्रीय विमानतळ आहे.
पण जगात काही असे देश आहेत जिथे विमानतळ नाही.
फ्रान्स आणि स्पेनमध्ये वसलेल्या अंडोरा या देशाला विमानतळ नाही. या देशाच्या जवळचे विमानतळ बार्सिलोना आणि टूलूस या ठिकाणी आहेत.
स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये वसलेल्या लिकटेंस्टीन या देशात विमानतळ नाही. येथे फिरायला येण्यासाठू तुम्हाला स्वित्झर्लंडमधून यावा लागतं.
लक्झरी लाईफ आणि कॅसिनोसाठी प्रसिद्ध असलेल्या मोनॅकोमध्ये अद्यापही विमानतळ नाही. या देशात येण्यासाठी प्रवासी फ्रान्समध्ये येतात त्यानंतर तिथून कार किंवा हेलिकॉप्टरने मोनॅकोमध्ये येऊ शकतात.
जगातील सर्वात लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये अजूनही विमानतळ नाही. या देशाच्या जवळचे विमानतळ फियुमिसिनो विमानतळ आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.