Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Hardeep Singh Nijjar Case: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
Hardeep Singh Nijjar Case
Hardeep Singh Nijjar CaseSaam TV

Hardeep Singh Nijjar Murder Case

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कॅनडा पोलिसांना असा संशय आहे की, अटक केलेल्या लोकांना भारत सरकारने गेल्या वर्षी निज्जरला मारण्याची सुपारी दिली होती.

Hardeep Singh Nijjar Case
Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

सीबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी कॅनडातील संशयितांची ओळख पटवली होती. तेव्हापासून कॅनडा पोलीस त्यांच्यावर कडक पाळत ठेवून होते. अखेर शुक्रवारी (ता. ३) त्यांना अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

जून २०२३ मध्ये कॅनडातील व्हँकोव्हरमधील एका पार्किंग स्लॉटमध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या केली होती. दोन अज्ञात हल्लेखोरानी निज्जर याच्यावर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय मिळण्याच्या मुद्द्याला पुन्हा हवा देणारी ठरली.

हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यांच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर निर्बंध आले.

दरम्यान, या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी आता तीन भारतीय संशयितांना अटक केली आहे. करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार, अशी अटक करणाऱ्या आलेल्या भारतीय नागरिकांची नावे आहेत.

त्यांच्यावर निज्जरची हत्या करणे, हत्येचा कट रचणे, असे आरोप करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांवरून तिन्ही संशयित भारतीय नागरिक असल्याचं समोर आलं आहे. ग्लोबल न्यूजने दिलेल्या वृत्तात संशयितांची ओळख भारतीय नागरिक म्हणून करण्यात आली आहे.

Hardeep Singh Nijjar Case
Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com