हैदराबाद : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद केलाय. हैदराबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी रोहितच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासादेखील केलाय. रोहितला आपण दलित नसल्याची माहिती होती आणि त्याची खरी जात कळण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या केली होती, असा दावा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करताना केलाय.
जानेवारी २०१६ मध्ये रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे विद्यापीठांमध्ये दलितांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाविरोधात देशभरात निदर्शने झाली होती. हैदराबाद पोलिसांनी सध्याच्या प्रकरणात शुक्रवारी तेलंगणा उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. या रिपोर्टनुसार रोहित हा दलित नव्हता आणि त्याची खरी जातीय ओळख सर्वांना कळेल या भीतीने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटलंय.
क्लोजर रिपोर्टनुसार, सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आलीय. सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, आमदार एन. रामचंदर राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्याशिवाय केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. रोहितच्या मृत्यूच्या वेळी स्मृती इराणी या मनुष्यबळ विकास मंत्री होत्या.
पुराव्याअभावी हे प्रकरण बंद करण्यात आल्याचं पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय. दरम्यान हायकोर्टाने आता वेमुला कुटुंबाला निषेध याचिकेच्या स्वरूपात कनिष्ठ न्यायालयात अपील करण्याचे निर्देश दिलेत. यासंदर्भात वेमुला कुटुंबीय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना भेटण्यासाठी ४ मे रोजी हैदराबादला जाणार असल्याची माहिती रोहितचा भाऊ राजा वेमुलाने दिलीय. दरम्यान २०१७ नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला होता. वेमुला कुटुंबीयांच्या जात पडताळणी प्रकरणातील १५ साक्षीदारांच्या जबाबांची मालिका जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.