Pune Car Accident: न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवत आहेत; पुणे अपघात प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक

Rahul Gandhi News: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आता आक्रमक झालेत. न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवतायत, अशी टीका राहुल गांधींनी केलीय.
न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवत आहेत; पुणे अपघात प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi on Pune Car Accident Saam Tv
Published On

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आता आक्रमक झालेत. न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवतायत, अशी टीका राहुल गांधींनी केलीय. पुण्यात जो अपघात झाला आहे, यात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दोघांना चिरडलं. यावरूनच राहुल गांधी आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर यांच्याकडून चुकून अपघातात कोणाचा मृत्यू झाला, तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होते. मात्र श्रींमत घरातला 16 , 17 वर्षांचा मुलगा पोर्शे कार मद्य प्राशन करून चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो. तर त्याला सांगितलं जातं की निबंध लिहा.''

न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवत आहेत; पुणे अपघात प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक
Pune Car Accident : जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

ते म्हणाले, अशीच घटना बस, ट्र्क ड्रायव्हर यांच्याकडून घडल्यास त्यांच्याकडून निबंध का लिहून घेतला जात नाही? नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आलं दोन भारत बनत आहे, एक श्रीमंतांचा आणि एक गरिबांचा. यावर त्यांनी उत्तर दिलं, काय मी सगळ्यांनाच गरीब बनवू?''

राहुल गांधी म्हणाले की, ''प्रश्न हा नाही आहे, प्रश्न न्यायाचा आहे. श्रींमत असो की, गरीब.. दोघांना न्याय मिळायला हवा. न्याय सगळ्यांसाठी समान असायला हवा. म्हणून आम्ही लढत आहोत.''

न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवत आहेत; पुणे अपघात प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक
Nagpur News: 'मुलीला चांगलं आयुष्य देऊ शकत नाही', 3 वर्षांच्या चिमुकलीची जन्मदात्या आईनेच केली गळा दाबून हत्या

दरम्यान, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला याची पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात चौकशी करण्यात आलीय. विशाल अग्रवाल याला संभाजीनगरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. विशाल अग्रवाल याला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलंय. मेडिकल टेस्टनंतर विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर केलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com