Pune Car Accident : जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: आरोपीला सहज जामीन मिळण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणात दिली आहे. आज पुण्यात पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेत घेत ते असं म्हणाले आहेत.
जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis On Pune Porsche Car AccidentSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

आरोपीला सहज जामीन मिळण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणात दिली आहे. आज पुण्यात पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेत घेत ते असं म्हणाले आहेत.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''पुण्यात अतिशय गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आत्तापर्यंत काय घडलं आणि पुढची कारवाई काय करणार या संदर्भात बैठक घेतली केली.''

जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
SSC Board Result Date: दहावीचा निकाल कधी लागणार?, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितली तारीख

'त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही'

ते म्हणाले, ''बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) जी भूमिका घेतली, ती शासनाच्या आणि लोकांमध्ये निराश करणारी आहे. वरील कोर्टात पोलीस जातील. ज्यांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिले, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मुलाच्या वडिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पुढची कारवाई लकरच पोलीस करणार आहेत. २ लोकांचा मृत्यू होऊन त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही.''

फडणवीस म्हणाले आहेत की, रहिवासी भागातील जे पब आहेत, तिथे आयडेंटिटी चेक केलं जातं नाही. या संदर्भात हे मॉनिटर करणे, हे सुद्धा आज चर्चा केलं गेलं. ज्या भागात असे जॉईंट आहेत, तिथे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे. तसेच पबचे लायसन्स चेक करणे, बंधनकारक राहील. कुठल्या ही प्रकारचे लायसन्स देताना, तो रहिवासी भाग असू नये, याची एक प्रत पोलीस तयार करणार.

जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Prashant Kishor : भाजप किती जागा जिंकणार? प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी, आकडेवारीचा अंदाज सांगितला!

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पहिल्यांदाच पालकांच्या विरोधात जी तरतूद आहे, ती लागू केली आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल, हे काम केलं पाहिजे. पोलीस देखील या संदर्भात कडक कारवाई करतील.

याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, ''पोलिसांनी ३०४ दाखल केला, ३०४ अ दाखल केला नाही. ३०४ मध्ये हा गंभीर गुन्हा आहे. पोलिसांना दोषी धरणे चुकीचे आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com