पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर प्रतिनिधी
नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लिव्ह इन मधून जन्माला आलेल्या मुलीला चांगल आयुष्य देऊ शकत नसल्यानं गळा दाबून खून करत आरोपी आई स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाली आहे. प्रियांशी, असं त्या मृत चिमुकलीच नाव आहे. एमआयडीसी पोलिसानी गुन्हा दाखल करत आईला अटक केली आहे.
रिंकल, असं मारेकरी आईच नाव आहे. रिंकलचा विवाह झाला नसून ती 2020 पासून रामा राऊत याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती-पत्नी म्हणून राहत होते. यातूनच 2021 मध्ये प्रियांशी जन्माला आली होती.
रिंकल आणि रामा नागपूर येथील एमआयडीसीत पेपर कंपनीत एका खोलीत राहत होते. हे दोघे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील आहेत. रिंकलचे आई-वडील मरण पावल्यामुळे तिला मागे-पुढे कोणीच नव्हतं. त्यामुळे ती नातेवाईक असलेल्या रामासोबत नागपुरात लिव्हिंगमध्ये राहत होती.
दोघेही लिव्हिंगमध्ये राहत असताना रिंकलला रामाचे दुसऱ्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. यावरूनच त्यांचे वारंवार वाद होत होते. याच कारणावरून सोमवारी दोघांमध्ये वाद झाला. रागाच्याभरात रिंकल प्रियांशीला घेऊन कंपनीच्या बाहेर निघून गेली.
ती मुलीला काही अंतरावर एका निर्जनस्थळी नेऊन गेली. दोघातही होत असलेल्या वादात आपण आपल्या मुलीला चांगला आयुष्य देऊ शकत नाही. मी स्वतः अनाथ म्हणून जगली, असं मुलीला जगावं लागू नये, या नैराश्यातून तिने मुलीचा खून केला. त्यानंतर ती स्वतः एमआयडीसी पोलिसांना स्वाधीन झाली आणि घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करत महिलेला अटक करण्यात केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.