Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचं अपहरण, शेवटचे CCTV फुटेज आलं समोर

Pune Crime : खामगाव टेक परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पायल ही तिचे चुलते आणि चुलती यांच्याबरोबर बाहेर गेली होती. त्यावेळी एका इसमाने मुलीच्या काकाला दारू पाजून मुलीचं अपहरण केल्याची घटना घडलीय.
Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचं अपहरण, शेवटचे CCTV फुटेज आलं समोर
10-year-old girl Kidnap

सागर आव्हाड, साम प्रतिनिधींनी

पुणे: जिल्ह्यातील हावेली तालुक्यातील ऊरळी कांचन येथील खामगाव टेकमध्ये एका १० वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्या घटना घडली. खामगाव टेक ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आलीय.

पायल सुनिल धुळे (वय- १०, रा. खामगाव टेक, ता. हवेली) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी सुनील बाळू धुळे (रा. खामगाव टेक, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव टेक परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पायल ही तिचे चुलते आणि चुलती यांच्याबरोबर बाहेर गेली होती. यावेळी एक इसम हा पायल आणि तिच्या चुलत्याजवळ आला. यावेळी त्याने चुलत्याला बोलून या ठिकाणची त्या ठिकाणची ओळख सांगितली. पायलच्या काकाला बोलण्यात गुंतवलं. त्याचबरोबर बोलत बोलत मुलीची सर्व माहिती विचारून घेतली.

त्यानंतर त्या इसमाने मुलीच्या काकाला मोठ्या प्रमाणात दारू पाजली. त्यानंतर चलाखीने पायलला दुचाकीवर बसविले आणि त्या ठिकाणावरून निघून गेला. यावेळी काकीने सदर घटना मुलीच्या वडिलांना सांगितली. यावेळी परिसरातील खामगाव टेक आणि तसेच परिसरातील कंपनी, माजी सरपंच यांच्या घराशेजारील सीसीटीव्ही तपासले. सहजपूर परिसरातील सीसीटीव्हीत एक इसम मुलीला दुचाकीवरुन घेऊन जात असल्याचा दिसला.

दरम्यान, यावेळी एक इसम हा मुलीला दुचाकीवरून घेऊन जाताना दिसून आला आहे. त्याच्या गाडीचा नंबर थोड्या प्रमाणात दिसत आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून केला खून

पुण्यातील कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून तिचा खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. नऊ लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच मैत्रिणीची हत्या केली होती. भाग्यश्री सुडे (वय २२), असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. या घटनेत अगोदर आरोपींनी तरूणीचं अपहरण केलं त्यानंतर तिचा खून केला.

Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचं अपहरण, शेवटचे CCTV फुटेज आलं समोर
Buldhana Crime : संशयाचं भूत मानगुटीवर! बायकोची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com