Navi Mumbai Crime News: २० वर्षीय तरुण आणि २ अल्पवयीन मुलींकडून मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईत खळबळ

Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ५३ वर्षीय मॉरेशियन नागरिकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुली आणि २० वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे.
Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime NewsSaam

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ५३ वर्षीय मॉरेशियन नागरिकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुली आणि २० वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह पारसिक हिल परिसरात सापडला आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सय्यद मुस्तकीन खान या व्यक्तीला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कुमार बाबू असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो हॉटेल इंडस्ट्रीत ३० वर्षांहून अधिक वेळ काम करत होता. नोकरीच्या शोधात तो आठ महिन्यांपूर्वी मुलासोबत भारतात आला. तो आणि त्याचा मुलगा शाहबाज गावात भाड्याने राहत होते. शुक्रवारी दुपारी त्यांच्यात शेवटचे बोलणे झाले. शुक्रवारी तो आपल्या मित्रांना भेटणार होता.

बाबू आपल्या ज्या मित्रांना भेटणार होता. त्या दोन अल्पवयीन मुली होत्या. त्या चेंबूरच्या नटराज चित्रपटगृहाजवळील फुटपाथवर राहायच्या. त्या बेलापूर ट्राफिक जंक्शनवर फुले विकायच्या.

सय्यद मुस्तकीन खान आणि पिडित व्यक्ती शेजारी होते. आरोपीच्याच ओळखीने त्याची अल्पवयीन मुलींशी ओळख झाली होती. तो नेहमी या अल्पवयीन मुलींना भेटायचा. शुक्रवारीदेखील तो याच अल्पवयीन मुलींना भेटायला गेला, असे तपासात समोर आले आहे.

बाबू बेलापूरला अल्पवयीन मुलींना भेटला. त्यानंतर त्यांच्यासोबत दुचाकीवरुन पारसिक हिलकडे निघाला. तिथे त्याने बिअर प्यायली आणि मुलींनी कोल्ड्रिंक्स दिले, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

Navi Mumbai Crime News
Fake Document For RTE Admission : शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे RTE अंतर्गत प्रवेश, १७ पालकांवर गुन्हा

मद्यपान केल्यानंतर नवीन कुमार बाबू नशेत होता. त्याने अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या दोन मुलींनी त्याला अडवण्याचा प्रयत्नदेखील केली.परंतु त्याने गैरवर्तन केले. त्यामुळेच या दोन मुलींनी त्याच्यावर दगडाने वार केले. यातील एका मुलीने ही माहिती आरोपी खानला दिली. तो घटनास्थळी पोहचला. तेव्हा त्यानेही नवीन कुमार बाबूला दगडाने मारले, असेही पोलिसांमनी सांगितले.

पारसिक हिलवर मारामारी झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांनी आरोपीचा शोध घेतला. याप्रकरणी आरोपी सय्यद मुस्तकीन खानला अटक २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Navi Mumbai Crime News
Tamil Nadu Shocking News: दुसऱ्या मजल्याच्या छतावर बाळ अडकलेच कसे? आई सोशल मीडियावर झाली ट्रोल, सहन न झाल्यानं स्वतःलाच संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com