संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारामारी, Video Viral

chhatrapati sambhajinagar news : या घटनेबाबत पाेलिसांना माहिती मिळाली परंतु ताेपर्यंत विद्यार्थी पसार झाले हाेते. पोलिसांनी या ठिकाणी तातडीने पाहणी केली.
fight between two groups of students preparing for competitive exams in sambhajinagar
fight between two groups of students preparing for competitive exams in sambhajinagarSaam Digital
Published On

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या वाद मारामारी पर्यंत गेला. त्यातून एकमेकांना दगड, विटा मारण्यापर्यंत मजल गेली. मारामारी करणारे विद्यार्थ्यी हे स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी शहरात आल्याचे समजते. दरम्यान या घटनेची नाेंद पाेलिसांत झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील एन 11 भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला. त्यामुळे या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

fight between two groups of students preparing for competitive exams in sambhajinagar
IT Raid in Akola : अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड; नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

दोन गट एकमेकांवर भिडू लागले. दगड आणि विटांचा मारा करू लागले. काहींनी एकास कपडे फाटेपर्यंत मारले. या घटनेचा व्हिडिओ समाेर आला आहे. तसेच समाज माध्यमात देखील मारामारीचा व्हिडिओ व्हायरल हाेऊ लागला आहे.

या घटनेबाबत पाेलिसांना माहिती मिळाली परंतु ताेपर्यंत विद्यार्थी पसार झाले हाेते. पोलिसांनी या ठिकाणी तातडीने पाहणी केली. हे दोन्ही गट बाहेरचे होते असे सांगून या युवकांबाबत आमच्याकडे कुठलीही माहिती नाही असे पाेलिसांनी सांगितले. या घटनेची नाेंद पोलिसांत कुठही झालेली नाही अथवा काेणाची तक्रार दाखल नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

fight between two groups of students preparing for competitive exams in sambhajinagar
लातूर पाेलिसांचा क्लबवर छापा, जुगार खेळणा-या 74 जणांवर गुन्हा दाखल, 2 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com