Beauty Skin : महागड्या पावडर शिवाय गावच्या मुली नक्षत्रासारख्या सुंदर कशा दिसतात? वाचा सौंदर्याचं रहस्य

Village Girl Beauty Tips : गावाकडील महिलांचा दिनक्रम त्यांना आणखी सुंदर बनवतो. त्यांच्या आहारात फास्टफूड देखील अजिबात नसतं. त्यामुळे गावी राहणाऱ्या मुली कमालीच्या सुंदर दिसतात.
Beauty Skin
Beauty SkinSaam TV

शहरांमधील सर्वच मुली सुंदरतेसाठी विविध ब्युटी प्रोडक्टस्ट अल्पाय करतात. उन्हात बाहेर पडत नाहीत. गेल्या तरी मग लगेचच सनक्रिम चेहऱ्याला लावतात. त्यामुळे त्या कमालीच्या सुंदर दिसतात. मात्र गावातील मुली असं काहीच करत नाहीत. शिवाय शेतात काम करतात मग तरीही त्या मुंबईच्या किंवा शहरातील मुलींच्या तुलनेत अधिक सुंदर दिसतात. त्यांच्या नॅचरल ब्युटीचं रहस्य आम्ही खास तुमच्यासाठी शोधून आणलं आहे.

Beauty Skin
Beauty Hacks: स्वयंपाकघरातील हे पदार्थ उजळवेल चेहऱ्याचं सौंदर्य

कच्च दूध

दूधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे आपल्या शरिराला जास्तप्रमाणात प्रोटीन मिळतं. कच्च दूध आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं. गावी अनेकांच्या घरी गाया, म्हशी आणि शेळ्या असतात. त्याचे दूध काढण्याचे काम घरातील महिलांकडेच असते. त्यामुळे कच्च दूध हाताला लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याला देखील लागतं. त्यामुळे या महिलांचं सौंदर्य आणखी फुलून येतं.

फळांची साल

गावात विविध प्रकाची फळे असतात. फळं जास्त असल्याने त्याची विक्री करून घरात खाऊन देखील काहीवेळा फळ उरतात. गावातील महिलांकडे महागड्या क्रिम नसल्याने त्या उरलेली फळे घरी सुकवतात. त्याच्या साली वेगळ्या करतात. त्यानंतर या साली मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवून घेतात. ही पावडर रोज चेहऱ्याला वापरतात.

बेसन आणि हळदीचा लेप

बेसन आणि हळद या दोन्ही गोष्टी गावी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे येथील महिला स्किनवरील ग्लो वाढवण्यासाठी बेसन आणि हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतात. ही पेस्ट त्या आपल्या चेहऱ्यावर लावतात.

मेहनत

शहरातील महिला एका जागी बसून काम करतात. तर गावी राहणाऱ्या महिला घरातील सर्व कामे करून शेतात कामं करतात. त्यामुळे त्यांची शरिरयष्टी कायम सडपातळ राहते. शरीराचा व्यायाम होत असल्याने जेवण देखील पचत तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.

गावाकडील महिलांचा दिनक्रम त्यांना आणखी सुंदर बनवतो. त्यांच्या आहारात फास्टफूड देखील अजिबात नसतं. त्यामुळे गावी राहणाऱ्या मुली कमालीच्या सुंदर दिसतात.

Beauty Skin
Beauty Skin Tips : काळ्या अंडरआर्म्समुळे चार माणसांत हात वर करण्याची लाज वाटतेय? मग 'या' टिप्सने झटपट गायब होईल डार्कनेस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com