Government Scheme For Startup Google
बिझनेस

Government Scheme For Startup: तरुणांनो स्वतः चा बिझनेस सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनांमधून मिळतेय आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Government Scheme For Startup : अनेक तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. परंतु आवश्यक भांडवल नसल्याने व्यवसाय सुरु करु शकत नाही. परंतु सरकारच्या या योजनांमधून स्टार्ट अपसाठी आर्थिक मदत केली जाते.

Siddhi Hande

अनेकांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो. तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज असते. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे बिझनेसमॅन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु आता याच उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारकडून या योजने राबवल्या जात आहे. यामध्ये तरुणांना प्रशिक्षणापासून ते आर्थिक सहाय्यापर्यंत मदत केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच योजनांबद्दल माहिती देणार आहोत.

डेअरी उद्योजकता विकास योजना

डेअरी क्षेत्रात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.यामध्ये दूध उत्पादन, प्रक्रिया ते मार्केटिंगपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. या योजनेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खर्चाच्या २५ टक्के आणि राखीव प्रवर्गातील लोकांना आणि शेतकऱ्यांना ३३.३३ टक्के बॅक एंड रक्कम दिली जाणार आहे.

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट

लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना सुरु करण्यात आली आहे. क्रेडिट गॅरंटी फंड योजनेअंतर्गत केंद्र सरकार लघु उद्योगांना सवलतीच्या दरात कर्ज देते. त्याचसोबत कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता कर्ज देते.

पीएम विश्वकर्मा योजना

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोहार, न्हावी, शिंपी या लोकांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुम्हाला जर मूर्ती बनवता येत असेल तर तुम्हाला त्याचा उद्योग उभारता येऊ शकतो. त्याचसाठी सरकार तुम्हाला कर्ज देते. तसेच तुम्हाला प्रशिक्षणदेखील दिले जाते. या प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला ५०० रुपयांची स्टायपेंडदेखील दिली जाते. या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT