Gold-Silver Rate Fall Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा प्रति तोळा सोनं तुमच्या शहरात कितीने स्वस्त झालं

Gold Silver Price (5th June 2024): दोन दिवसांपासून सोने तसेच चांदीचे दर घसरत आहेत. अशात आजही १०० ग्राम सोनं २,००० रुपयांनी घसरलं आहे.

Ruchika Jadhav

काल लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकाल जाहीर होताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलंय. गेल्या दोन दिवसांपासून सोने तसेच चांदीचे दर घसरत आहेत. अशात आजही १०० ग्राम सोनं २,००० रुपयांनी घसरलं आहे.

आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६७,५०० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,७५० रुपये, ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,४०० रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,६७५ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर

आज २४ कॅरेट १ ग्राम सोन्याची किंमत ७,२८० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,२४० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७२,८०० रुपये इतकी आहे. तसेच १०० ग्राम सोन्याची किंमत ७,२८,००० रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज १८ कॅरेट १०० ग्राम सोनं ५,४६,१०० रुपयांवर आहे. १० ग्राम सोन्याची किंमत ५४,६१० रुपये आणि ८ ग्राम सोनं ४३,६८८ रुपये इतकी आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याच्या किंमती

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर नेहमी सारखेच असतात. त्यामुळे दोन्ही शहरांतील एक ग्राम सोन्याची किंमती पाहू - २२ कॅरेट ६,६०० रुपये. २४ कॅरेट ७,२६५ रुपये आणि १८ कॅरेट ५,४४९ रुपये.

चांदीच्या किंमती

प्रति किलो चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीची किंमत ९१,७०० रुपये आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ, पटना, अहमदाबाद या सर्वच शहरांत देखील चांदीची किंमत ९१,७०० रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT