Gold Price Hike : सोनं लागलं भाव खायला! वर्षभरात सोन्याची किंमत किती वाढली?

Gold Price Hike News in marathi : भारतीय लोकांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड आहे. खरंतर देशात महिलांना सोन्याचे दागिन्याची खूप आवड आहे. याच सोन्याच्या किंमतीत वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.
Gold Price Hike
Gold Price HikeSaam Digital
Published On

Gold Price Update :

भारतीय लोकांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड आहे. खरंतर देशात महिलांना सोन्याचे दागिन्याची खूप आवड आहे. याच सोन्याच्या किंमतीत वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी नेमकी किती वाढ झाली, जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

सोन्याच्या दरात मोठी वाढ

चालू आर्थिक वर्ष २०२३-२०२४ लवकरच संपणार आहे. त्याआधीच सोन्याच्या किंमतीत तिप्पट वाढल्याचे दिसून येत आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमचा ६८,८८० रुपये इतका भाव आहे. तर एका वर्षापूर्वी १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीचा भाव साठ हजारांच्या जवळपास होता. तब्बल एका वर्षांनी सोन्याच्या किंमतीत ८ हजारांपर्यत वाढ झाली आहे.

Gold Price Hike
Gold Silver Rate Today (29 March 2024) | दागिण्याचा भाव वाढला? येथे पाहा

चांदीच्या भावात तेजी

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक किलो चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात चांदीच्या किमंतीत २,५४५ रुपयांनी वाढ झाली आहे. आज शुक्रवारी प्रतिकिलो चांदीची (Silver) किंमत ७७,८०० रुपये होती. सोन्याच्या किंमतीबरोबर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.

मार्चमध्ये सोन्याच्या किंमतीने सोडले सर्व विक्रम

मार्चच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीने सर्व विक्रम मोडले. ५ मार्चला सोन्याची किंमत ६४,५९८ रुपये इतकी होती. तर ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्याच्या किंमती ऑल टाइम रेकॉर्ड मोडला.

Gold Price Hike
Today's Gold Silver Rate: सोन्याच्या भावात तेजी, चांदीच्या दरात उसळी; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील नवे दर

५ मार्चनंतर ७ मार्च रोजीच्या सोन्याच्या किंमतीने नवा इतिहास रचला. ७ मार्च रोजी सोन्याची १० ग्रॅमची किंमत ६५,०४९ रुपये इतकी होती. तर ११ मार्चला १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५,६४६ रुपये इतकी होती. तर वर्षभरानंतर आज २९ मार्च २०२४ रोजी सोन्याची किंमत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६८,८८० रुपये इतकी आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

मुंबई- ६८,७३० रुपये

पुणे - ६८,७३० रुपये

नाशिक - ६८,७६० रुपये

ठाणे - ६८,७३० रुपये

नागपूर - ६८,७३० रुपये

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com