मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक पातळी ओलांडली आहे. महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसात धातूच्या भावात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली. होळीपूर्वी सोन्याचे भाव नरमले होते परंतु, होळीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
मागच्या आठवड्यात सोने १५०० रुपयांनी तर चांदी २८०० रुपयांनी महागली. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
सोन्याचा भाव लवकरच ७० हजारांचा आकडा पार करु शकतो असे मत सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी नोंदवले. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,३१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६८,८८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात १,४२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,८०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबई- ६८,७३० रुपये
पुणे - ६८,७३० रुपये
नागपूर - ६८,७३० रुपये
नाशिक - ६८,७६० रुपये
ठाणे - ६८,७३० रुपये
अमरावती - ६८,७३० रुपये