कोमल दामुद्रे
केळी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. यामध्ये लोहाचे समृद्ध स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीर मजबूत राहते.
शरीरासाठी कच्ची नाही तर पिकलेली केळी फायदेशीर आहे. जाणून घेऊया कोणत्या आजारावर फायदेशीर ठरते.
कच्ची केळी मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर औषधांपेक्षा कमी नाही. याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.
कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रित करते. यामुळे हृदयाच्या आरोग्याचे अनेक आजार दूर होतात.
कच्च्या केळीमध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.
यात असणाऱ्या फायबरमुळे पोटाशी संबंधित विकार जसे पोट फुगणे, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
कच्च्या केळीत व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन -बी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.