कोमल दामुद्रे
भारतात सोनं खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते. कोणत्या खास प्रसंगी सोनं खरेदी करण्याला अधिक महत्त्व आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या आयतदरांपैकी एक आहे.
परंतु, दुबईमध्ये भारताच्या तुलनेत सोन्याची किंमत खूपच कमी आहे.
अनेकजण दुबईला जाऊन सोनं खरेदी करतात. पण भारताच्या तुलनेत सोन्याची किंमत इतकी कमी का आहे? जाणून घेऊया
दुबईमध्ये आयात शुल्क कमी आकारले जाते. भारतात आयात शुल्क जास्त असल्याने किमती अधिक असतात.
भारतात सोनं आयात करताना शुल्क भरावे लागते. पण दुबईत सोन्याच्या आयातीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दुबईत सोने स्वस्त असल्याने भारतीय लोक दुबईत राहाणाऱ्या ओळखीच्या व्यक्तींकडून खरेदी करुन घेतात.
दुबईत सोन्याच्या दागिन्यावर मेकिंग चार्जेस अधिक आकारला जातो तसेच तिथून सोनं भारतात आणताना कस्टम ड्युटी जास्त असते.
ऑल इंडिया जेम एंड ज्वेलरी डॉमेस्टिकच्या मतानुसार दुबईत सोनं खरेदी केल्याने अधिक बचत होत नाही.