कोमल दामुद्रे
आपल्यापैकी अनेकांना परदेशात फिरण्याची इच्छा असते. पण त्यावेळी आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे ऐनवेळी त्रास सहन करावा लागतो.
तुम्ही देखील पहिल्यांदाच परदेशात फिरायला जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा
पासपोर्ट बनवल्यानंतर परदेश प्रवासाची योजना बनवा तसेच व्हिसा स्टॅम्पचा फोटोही घ्या.
ज्या तारखेला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर विमान तिकिटे आणि हॉटेल्स वेळेत बुक करा. ज्यामुळे ऐनवेळी खर्च जास्त होणार नाही.
फिरायला ज्या ठिकाणी जाताय त्या देशाची संस्कृती, परंपरा, कायदे याची माहिती जरुर लक्षात ठेवा.
परदेशात फिरायला जात असाल तर परकीय चलन जवळ ठेवा.
भारताचे UPI हे फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, ओमान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, दुबईसह अनेक देशांमध्ये करता येईल.
फोनमध्ये ट्रान्सलेटर अॅप ठेवा, म्हणजे भाषा न कळल्यास मदत होईल.
परदेशात प्रवास करताना तुमचा पासपोर्ट नेहमी सोबत ठेवा. कागदपत्राची सॉफ्टकॉपी आणि हार्ड कॉपी सोबत ठेवा.