Gold-Silver Rate Fall: यंदाची वटपोर्णिमा होणार स्पेशल; सोने-चांदीचे भाव उतरले; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील भाव

Gold Silver rate 3rd June 2024: सोने चांदीचे नवीन दर जाहीर झाले आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण झाली असल्याने यंदाची वटपोर्णिम महिलांसाठी स्पेशल होणार असल्याचे दिसत आहे.
Gold Silver Rate
Gold Silver Rate Saam Tv
Published On

यंदा ६ जून रोजी वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपोर्णिमेला महिला नवीन वस्तू खरेदी करतात. त्यात विशेषतः सोने-चांदीच्या वस्तूंचा समावेश असतो. दरम्यान सोने-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोने-चांदीचे भाव आज कमी झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर जवळपास ४४० रुपयांनी उतरले आहेत. तर एक किलो चांदीचे दर ७०० रुपयांनी उतरले आहेत.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

देशभरात २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,१०० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५२,८८० रुपये आहे. काल ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,२०० रुपये होती. तर १ तोळा सोन्याची किंमत ६६,५०० रुपये होती.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

देशात २४ कॅरेट सोने ७२,११० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोने ५७,६८८ रुपये विकले जात आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ४४० रुपयांनी घट झाली आहे.

Gold Silver Rate
Dal-Rice Prices Increase : गरिबाच्या ताटातील वरण भातासह पालेभाज्याही महागला; वाचा वाढलेल्या किंमती

चांदीची किंमत

देशात १ किलो चांदी ९२,८०० रुपयांना विकली जात आहे. चांदीच्या किंमतीत ७०० रुपयांनी घट झाली आहे. काल एक किलो चांदीची किंमत ९३,५०० रुपये होती.

उद्या लोकसभा निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महागाई कमी होईल असं सर्वसामान्यांना वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करावे की नाही हा प्रश्न पडत आहे. आज सोन्याच्या दरात जवळपास ४०० रुपयांना घट झाली आहे.

Gold Silver Rate
Increased Toll Tax : टोल टॅक्सच्या दरात 5 टक्क्यांची वाढ; निकालाच्या आदल्या दिवशी वाहनचालकांना मोठा झटका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com