Gold Silver Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Rate Today: मे महिन्यात सर्वात जास्त लग्न होतात. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानावर नागरिकांना गर्दी पाहायला मिळते. सध्या सोने- चांदी खरेदी वाढताना दिसत आहे.
Gold Silver Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver PriceSaam Tv

मे महिन्यात सर्वात जास्त लग्न होतात. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानावर नागरिकांना गर्दी पाहायला मिळते. सध्या सोने- चांदी खरेदी वाढताना दिसत आहे. त्याचसोबत मागील काही दिवसात सोने- चांदीचे भावदेखील वाढले होते. परंतु आज सोने चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमती १००० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर चांदीचे भावही कमी झाले आहेत.

आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून २२ कॅरेट सोने ६७,३०० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर २४ कॅरेट सोने ७३,४२० रुपये प्रति तोळा विकले जात आहे.

देशात १ किलो चांदी आज ९२,५०० रुपयांनी विकली जात आहे. एक किलो चांदीच्या किंमत ३,३०० रुपयांनी घट झाली आहे. काल चांदीच्या किंमतीत ३०० रुपयांनी वाढ झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. मे महिन्याच्या सुरुवातील सोन्याचा भाव जवळपास ७५ हजार रुपये झाला होता. मात्र, आता भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Government Scheme: दर महिन्याला २१० रुपये भरा अन् वर्षाला ६० हजारांची पेन्शन मिळवा; कशी आहे सरकारची अटल पेन्शन योजना?

विविध शहरांमधील सोने- चांदीच्या किंमती

मुंबई (Mumbai Gold Price)

सोने- ७३,४२० रुपये प्रति तोळा

चांदी- ९२,५०० रुपये प्रति किलो

पुणे (Pune Gold Price)

सोने-७३,४२० रुपये प्रति तोळा

चांदी-९२,५०० रुपये प्रति किलो

दिल्ली

सोने- ७३,५७० रुपये प्रति तोळा

चांदी- ९२,५०० रुपये प्रति किलो

कोलकत्ता

सोने- ७३,४२० रुपये प्रति तोळा

चांदी- ९२,५०० रुपये प्रति किलो

Gold Silver Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Mahindra XUV700 AX5: आकर्षक लूक ,जबरदस्त सेफ्टी फीचर आणि बरंच काही; महिंद्राचा नवा मॉडेल लाँच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com