Government Scheme: दर महिन्याला २१० रुपये भरा अन् वर्षाला ६० हजारांची पेन्शन मिळवा; कशी आहे सरकारची अटल पेन्शन योजना?

Atal Pension Yojana: प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे अनेकजण भविष्याच्या दृष्टीने आर्थिक गुंतवणूक करतात. अडचणीच्या काळात हेच पैसे उपयोगी पडतात.
Government Scheme
Government SchemeSaam TV
Published On

प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे अनेकजण भविष्याच्या दृष्टीने आर्थिक गुंतवणूक करतात. अडचणीच्या काळात हेच पैसे उपयोगी पडतात.त्यामुळेच सरकारच्या अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकतात. सरकारच्या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. ही योजना सरकारद्वारे राबवली जाते. यात सरकार कर्मचारी आणि कामगारांना सेवानिवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळवून देते. यासाठी तुम्हाला दरमहिन्याला फक्त २१० रुपयांची गुंतवणूक करायची असते. यात तुम्हाला वार्षित ६० हजार रुपये पेन्शन मिळते. जाणून घेऊया या योजनेबद्दल.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला २१० रुपये जमा करायचे असतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजे वर्षाला ६०,००० रुपये मिळतील. या योजनेत तुम्ही दर तीन महिन्यांनीदेखील पैसे भरु शकतात. परंतु दर तीन महिन्यांनी तुम्हाला ६२६ रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही सहा महिन्यांनी पैसे भरले तर तुम्हाला १२३९ रुपये भरावे लागतील. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिना ४२ रुपये भरल्यास तुम्हाला दरमहिना १,००० रुपये मिळतील.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

सेवानिवृत्तीनंतर लोकांना दर महिना ठरावीक रक्कम मिळावी हा या योजनाचा उद्देष आहे.या योजनेत लोकांना दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न सुरु राहते. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे चालवली जाते.

Government Scheme
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर; 1 लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला १,००० ते ५००० रुपये मिळतात. या योजनेत सरकार पेन्शनची हमी देते. तुम्ही जी रक्कम गुंतवणूक करतात त्यावर तुम्हाला भविष्यात किती रुपये पेन्शन मिळणार हे आवश्यक असते.

Government Scheme
Hero Hf Deluxe ची बाजारात मोठी मागणी, देते 65km चा मायलेज; किंमत फक्त 59,998 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com