Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

Mumbai Pune Expressway Closed Today : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण महामार्गावर आज पुन्हा एक तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद
Mumbai Pune Expressway Closed Todaysaam tv

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण महामार्गावर आज पुन्हा एक तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक समस्या लक्षात घेता गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू होईल. त्यामुळे मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

  • पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहनं राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना मुंबई-पुणे महामार्गानं मुंबईच्या दिशेनं वळवण्यात येतील.

  • हलकी वाहने व बसेस खोपोली येथून वळवून पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे वळवण्यात येतील.

  • खोपोली एक्झीटवरून वळवण्यात आलेली वाहने शेडूंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.

  • हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट येथून वळवून शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद
Horoscope Today : संधीचे सोने कराल, 'या' राशींना मिळेल यशाचा तुरा; वाचा आजचे राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com