Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: खुशखबर! सोनं तब्बल १६०० रुपयांनी घसरलं; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Today Gold Rate: आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दिवस खूप चांगला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Siddhi Hande

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव १६३० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी आज उत्तम संधी आहे.

सध्या सणासुदीचे दिवस येत आहे. वटपोर्णिमा सण आहे. या दिवशी अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे वाढते भाव पाहून ग्राहकांना चिंता वाटत होती. मात्र, आज हे दर कमी झाले आहेत.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १६३० रुपये प्रति तोळा घट झाली आहे. आज सोने प्रति तोळा ९७,९७० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,३७६ रुपये आहे. या दरात १३०४ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर आज चांगलेच उतरले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज १० ग्रॅम सोन्याचे दर ८९,८०० रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी घट झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,८४० रुपये झाले आहेत. या दरात १२०० रुपयांनी कपात झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १२२० रुपयांनी घट झाली आहे. आज एक तोळा सोने ७३,४८० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,७८४ रुपये आहे. या दरात ९७६ रुपयांनी घट झाले आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात काहीही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८५६ रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १०७० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT