MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

MHT-CET news : सीईटी गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर राज्य सीईटी सेलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
cet merit news
cetSaam tv
Published On

एमएचटी-सीईटी बीई/बीटेक गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. या गुणवत्ता यादीवरून सुरू असलेल्या चर्चेवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) अधिकृत खुलासा केलाय. सीईटीचीची प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि त्रुटीमुक्त आहे. तसेच या गुणवत्ता यादीत कोणताही घोटाळा किंवा फेरफार झालेला नाही, असा दावा सीईटी सेलने केलाय.

cet merit news
11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश पोर्टल अचानक ठप्प; नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी सीईटीच्या गुणवत्ता यादीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काही विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या गुणांच्या तुलनेत सीईटी परीक्षेत मिळालेल्या १०० पर्सेंटाईल गुणांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आरोपांनंतर परीक्षा प्रक्रियेवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. सावंत यांचे आरोप फेटाळून लावत राज्य सीईटी सेलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सीईटी सेलने स्पष्ट करताना म्हटलं की, सीईटी विभागाचा कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालवला जातो. यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. तसेच २०२५ च्या सीईटी गुणवत्ता यादीत तांत्रिक चूक झालेली नाही.गुण आणि रँकिंग हे ठरवून दिलेल्या नियम आणि निकषांनुसारच तयार करण्यात आले आहेत'.

गुणवत्ता यादीवरून झालेला संभ्रम दूर करण्याचे आवाहन सीईटी सेलने म्हटलं. याबाबत विद्यार्थी किंवा पालकांनी सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सीईटी सेल केलं. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सीईटीच्या गुणवत्ता यादीबाबत, पर्सेंटाईल पद्धतीबाबत किंवा रँकिंगबाबत काही शंका अथवा प्रश्न असतील, त्यांनी थेट सीईटी कक्षाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी पुढे सांगितले.

cet merit news
11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने सांगितलं की, सीईटी प्रशासनाने घेतलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळे प्रवेश प्रक्रियेची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळालाय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com