Today’s gold rate in Mumbai and Pune for 24 carat gold in Marathi : पुन्हा एकदा सोन्याच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी, ६ जून रोजी सराफा बाजार सुरू (Gold Rate 6th June 2025) होताच सोन्याच्या दराने उसळी घेतली. गुरूवारच्या तुलनेत २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत प्रतितोळा एक लाख रूपयांच्या घरात पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली होती, पण जून महिन्यात पुन्हा एकदा सोन्याची किंमत वाढताना पाहायला मिळत आहे.
मुंबई, पुण्यासह जळगाव अन् देशभरातील सर्वच शहरात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९९ हजार रूपयांच्या पार गेले आहेत. गुरूवारी जीएसटीसह सोन्याची किंमत प्रतितोळा एक लाख रूपयांपर्यंत पोहचली होती, सराफा बाजार बंद होण्याआधी सोन्याची किंमत थोडी घसरली होती. पण आज, शुक्रवारी सराफा बाजार सुरू होताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळाली. मुंबई, पुण्यापासून दिल्लीपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील सर्वच शहरात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९९ हजारांच्या पार पोहचले आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९१ हजार रूपये इतकी झाली आहे.
Delhi Gold Rate : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 99,760 इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,460 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Mumbai Gold Rate : मुंबईमध्ये सोन्याची किंमत दिल्लीच्या तुलनेत कमी आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 99,180 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईमध्ये प्रतितोळा 91,310 रुपये आहे.
kolkata Gold Rate : कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर २४ कॅरेट सोनं एक तोळा सोन्यासाठी 99,180 रुपये मोजावे लागतात.
Chennai Gold Rate : चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,180 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Ahmedabad Gold Rate: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 तर २४ कॅरेट सोन्याची किंमत 99,610 रुपये प्रति 10 ग्राम इतकी आहे.
Lucknow Gold Rate: लखनऊत 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,460 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,760 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Gold Rate in Jaipur: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,460 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,760 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Patna Gold Rate: पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,610 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Gold Rate in Hyderabad: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,610 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Gurugram Gold Rate: गुरुग्राम में 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,460 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोने 99,760 रुपये प्रतितोळा मिळतेय.
Gold Rate Bengaluru : बेंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,310 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,610 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
Gold Rate Noida : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,460 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,760 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीलाही चकाकी आली आहे. सराफा बाजारात आज चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. आज चांदीच्या दरामध्ये दोन हजार रूपयांनी वाढ पाहायला मिळाली. आज सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 1,04,100 रूपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.