Gold Rate Today : खरेदीदारांना मोठा झटका! सोनं चकाकलं तर चांदीही महागली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Check Gold Price Mumbai & Jalgaon: सोनं पुन्हा चकाकलं आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे.
gold rate
gold rate today Saam tv
Published On

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव : जळगावातील सराफ बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा एका तोळ्यामागील दर एक रुपयांवर पोहोचला आहे. २४ तासांत सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २ हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीसएटीसह ९९ हजार ९१० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे.

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा दरात वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी सोन्याचे दर थेट १ लाखापर्यंत पोहोचले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसहित ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. चांदीच्या दराने एक लाखांचे आकडा पार केला आहे. चांदी जीएसटीसह १ लाख चार हजार ५४५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

gold rate
Akola Crime : जामिनावर बाहेर आला अन् इमारतीतील इंजिनीअरशी बिनसलं; रागात धारदार शस्त्राने वार करत संपवलं

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार कायम आहे. तर दुसरीकडे सोन्या चांदीचे दर एक लाखांवर पोहोचल्याने सराफ बाजारात ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सोने आणि चांदीमध्ये होत असलेल्या सततच्या चढ उतारामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. यामुळे सराफ बाजारात त्याचा मोठा परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

gold rate
Vande Bharat First Sleeper Trains: मुंबईतून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असेल मार्ग? जाणून घ्या

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,०६० रुपयांवर पोहोचला आहे.

सोनं का महागलं?

व्यावसायिक आणि राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार वर्ग सोन्याकडे वळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी आयातावरील टॅरीफ २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यत वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे सोन्याचा दरात वाढ झाली आहे.

gold rate
Ladki Bahin Yojana : 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार? तुमचं नाव यादीत आहे का? वाचा सविस्तर, VIDEO

जगभरात वाढता व्यवसाय आणि राजकीय तणावामुळे सोनं पुन्हा लाखांवर जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच सोन्याच्या दरवाढीला डॉलरमधील घसरण देखील कारणीभूत मानली जात आहे. सुरक्षित गुंतणूक देखील सोने खरेदीकडे पाहिलं जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com