Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिधेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली आहे.
Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी
Fuel CrisisSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रात डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य त्रस्त

  • अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या

  • गडचिरोली, नांदेड आणि परभणीमध्ये नागरिकांना डिझेलसाठी तासन्तास थांबावे लागते

  • जालन्यात पेट्रोल पंप व्यवस्थापकाला मारहाण आणि पंप जाळण्याची धमकी देण्यात आली

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

राज्यातील पेट्रोल डिझेलच्य़ा टंचाईमुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. इंधन टंचाईचा हा भडका कसा पेटलाय. पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी आणि इंधन मिळवण्यासाठी झुंबड कशी उडतेय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

राज्यात सध्या इंधनाचा भडका उडालाय, पण हा भडका दरांचा नाही तर थेट इंधन टंचाईचा आहे. मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र सध्या डिझेलच्या भीषण टंचाईंनं होरपळतोय. कुठे पेट्रोल पंपांवर 'डिझेल नाही'चे फलक झळकतायत, तर कुठे डिझेलसाठी 2 ते 4 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेत. गडचिरोलीत डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांबचं लांब रांगा लागल्याचं चित्र आहे.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

दुसरीकडे नांदेडमध्येही डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड उडालीय. परभणीतही 11 दिवसांपासून डिझेल टंचाई कायम असून शेतकऱ्यांना तब्बल 10 तास रांगेत उभं राहावं लागतयं. दरम्यान जालनाच्या वाटूर फाटा येथील पेट्रोल पंपावर 2 हजार रुपयांचं डिझेल मिळत नसल्यानं पेट्रोल पंपावरील मॅनेजरला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. इतकचं नव्हे तक माचिसनं पूर्ण पेट्रोल पंप फुकून टाकण्याची धमकी ही मारहाण करणाऱ्या नागरिकांनी दिल्याचा प्रकार समोर आलाय.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

दरम्यान डिझेलच्या टंचाईने आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पंपांवर होणाऱ्या हाणामारीच्या आणि थेट पंप पेटवण्याच्या धमक्यांच्या घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. मात्र एकीकडे सरकार पुरेसा साठा असल्याचं सांगत असताना पुरवठा साखळीत नेमकी कुठे गडबड झालीय? शेतकऱ्यांना आणि नागरिकांना इंधन पुरवठा सुरळीत का केला जात नाहीय? सरकार यावर ठोस पावलं कधी उचलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलयं.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी
Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com