Gold Rate : सोनं खरेदीला जाताय? त्याआधी वाचा २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत

Gold Rate Today in Marathi : आज सोन्याचा दर पुन्हा वाढला आहे. २४ कॅरेट सोनं ₹९८,२३० आणि २२ कॅरेट ₹९०,०५० प्रति तोळा झाला आहे. चांदी ₹९९,९०० प्रति किलो. जाणून घ्या आजचे सोने व चांदीचे दर मुंबई, पुणे, दिल्ली आणि जळगावसाठी.
Gold Rate on Akshaya Tritiya
Gold Rate Todaysaam tv
Published On

Gold Rate Today in Mumbai Pune : आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याला झळाळी पाहायला मिळाली. मुंबई, पुणे, दिल्ली अन् जळगावसह देशभरात सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसत आहे. शुक्रवारी, २३ मे रोजी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळली होती. अमेरिकन डॉलर मजबूत आणि ट्रम्प यांच्या 'वन बिग ब्यूटीफुल बिल' यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. goodreturns वेबसाईटनुसार, २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत 98,230 प्रति तोळा इतकी झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (24K Gold Rate Today)

शनिवारी देशात सोन्याच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळाली. सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट आणि २२ कॅरेटच्या सोन्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेटच्या सोनं प्रति तोळा ५५० रूपयांनी वाढून ९८ हजार २३० रूपये इतकी झाली. शुक्रवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ९७ हजार ६८० रूपये इतकी झाली होती. २४ कॅरेटच्या सोनं प्रति दहा तोळं सोन्याची किंमत ५५०० रूपयांनी वाढ झाली. १० तोळं सोन्याची किंमत आज ९,८२,३०० इतकी झाली आहे.

Gold Rate on Akshaya Tritiya
Jalna : मध्यरात्री काळाचा घाला, अपघातात माय-लेकीचा जागेवरच मृत्यू, २ जण जखमी

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (24K Gold Rate Today)

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति १० तोळं ५००० रूपयांनी वाढला. तर एक तोळं सोनं ५०० रूपयांनी वाढले. एक तोळा सोन्याची किंमत ९० हजार ०५० रूपये इतकी झाली आहे. तर १० तोळं २२ कॅरेट सोनं ९००५०० रूपये इतकी झाली आहे.

Gold Rate on Akshaya Tritiya
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा भाजपला झटका, माजी मंत्री शिवसेनेच्या वाटेवर?

चांदीची किंमत किती ?

चांदीच्या किंमतीत शनिवारी किंचितशी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी सराफा बाजार उघडताच चांदीची किंमत १०० रूपयांनी कमी झाली. आज चांदीची किंमत ९९ हजार ९०० रूपये प्रति किलो इतकी आहे. इंदोर येथे सराफा बाजारात २३ मे रोजी चांदीची किंमत स्थिर राहिली होती. दिल्ली आणि मुंबईमध्ये चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या किंमतीत चढ-उतार का होतो?

सोन्याच्या किंमतींमध्ये तीन सत्रांनंतर प्रथमच घसरण नोंदवली गेल्याचे मानव मोदी यांनी सांगितले. सुरुवातीला सोने दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते, परंतु डॉलर निर्देशांकात 0.3% वाढ झाल्याने ही वाढ संपुष्टात आली. ट्रम्प यांच्या कर विधेयकाला अमेरिकी प्रतिनिधी सभागृहात बहुमताने मंजुरी मिळाली, त्यामुळे ही तेजी आली. या विधेयकामुळे पुढील दहा वर्षांत अमेरिकेच्या 36.2 ट्रिलियन डॉलरच्या कर्जात 3.8 अब्ज डॉलरची भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष महागाई आणि सरकारी खर्चाच्या चिंतांकडे वळले आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com