Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: सोन्याची चकाकी उतरली, भाव कमी झाले; वाचा तुमच्या शहरातील दर

Today Gold Rate Fall: आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. प्रति तोळा ४४० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर उतरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या भावात आज घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे भाव वाढत आहेत. दरम्यान, आज सोन्याची झळाली कमी झाली आहे. सोन्याचे भाव आज कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे भाव आज प्रति तोळा ४४० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आजच करा. (Gold Silver Rate Today)

आज सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Fall Today)

२४ कॅरेट सोन्याच्या किंमत प्रति तोळा ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. आज १ तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. काल हेच दर ९८,०८० रुपये होते. या किंमती घसरल्या आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ४४०० रुपयांनी घट झाली आहे.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ८९,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहेत. या किंमतीत ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. आज १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.

अनेकजण आपल्या लेकीच्या लग्नासाठी दागिने करत असतात. थोडे-थोडे पैसे जमवून सर्वसामान्य नागरिक दागिने करतात. परंतु सध्या सोन्याचे दर खूप वाढले आहेत. जीएसटी मिळून सोन्याचे भाव १ लाखांच्या पार गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे सोन्याचे भाव बघूनच खरेदीसाठी जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT