अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Amravati accident today : अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर हायड्रा क्रेनने पायी जाणाऱ्या पाच मजुरांना धडक दिली. या भीषण अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Amravati Hydra crane accident latest news
Amravati Hydra crane accident latest newsSaam TV
Published On: 

अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी

Amravati Hydra crane accident latest news : अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. यावली शहीद ते अडगाव मार्गावर पायी चालत जाणाऱ्या ५ मजुरांना मागून आलेल्या एका हायड्रा क्रेनने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

स्थानिकांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर अडगावकडून यावली शहीदकडे पायी चालले होते. यादरम्यान मागून आलेल्या भरधाव हायड्रा क्रेनने त्यांना जोरदार उडवले. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Amravati Hydra crane accident latest news
दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांमध्ये राजेश बायस्कर, दिनेश आणि मदारी या तिघांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पिंटू चव्हाण आणि राजू पानसे यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Amravati Hydra crane accident latest news
Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी

अपघातातील मृत आणि जखमी मजूर हे शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील बक्की चिखली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com