Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Maharashtra weather forecast : दसऱ्यापूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे? वाचा सविस्तर हवामान अपडेट.
Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
MAHARASHTRA WEATHER UPDATESaam Tv
Published On: 

Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा चटका आणि उकाडा सातत्याने वाढत आहे. पण दुसरीकडे मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक सोलापूरसह १४ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्याशिवाय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra weather today, IMD Maharashtra yellow alert)

‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याशिवाय रायगड, पुणे, सातारा, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात इतर जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम राहू शकतो.

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

एकिकडे उकाडा, तर दुसरीकडे पावसाची हजेरी

सध्या राज्याच्या तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक भागात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. शनिवारी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, यवतमाळमध्ये राज्यातील सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती आणि सोलापूर येथे ३७ अंशांपेक्षा जास्त, तर धुळे, निफाड, जळगाव, सांताक्रूझ, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि वाशीम येथे तापमान ३६ अंशांवर पोहोचले होते.

दुसरीकडे, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा तडाखा आणि उकाडा असाच कायम राहण्याचा अंदाज असून, दसऱ्याच्या तोंडावर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह होणारा हा पाऊस नागरिकांची तारांबळ उडवण्याची शक्यता आहे.

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली.

विजांसह पावसाची शक्यता : रायगड, पुणे, सातारा, बीड, परभणी.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : यवतमाळ ३७.८, अमरावती ३७.४, ‎सोलापूर ३७.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com